लोहारा तालुक्यातील नागूर येथे 5 कोटी 80 लाख रु. निधीच्या विविध विकास कामांचे भुमिपुजन आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते व युवासेनेचे मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि.२२) करण्यात आले.
तालुक्यातील नागुर येथील ग्रामस्थांनी विविध विकास कामासाठी आ. ज्ञानराज चौगुले यांच्याकडे निधीची मागणी केली होती. या मागणीची तात्काळ दखल घेऊन आ.चौगुले यांनी प्रजिमा 43 कि.मी. 6/00 ते 9/00 (भाग नागूर ते जुने खेड) व कि. मी. 9/500 ते 11/00 (भाग जुने खेड ते खेड) रस्त्याची सुधारणा करणे 4 कोटी रुपये, आ. ज्ञानराज चौगुले यांच्या स्थानिक विकास निधीतुन नागूर येथील अंगणवाडीजवळ ग्रामपंचायतच्या खुल्या जागेत सार्वजनिक सभामंडप बांधकाम करणे 20 लाख रुपये, प्रजिमा 43 कि. मी. 4/300 ते 6/00 (भाग कास्ती ते नागूर) रस्त्याची सुधारणा करणे 1 कोटी 60 लाख रुपये, आदी विकासकामांसाठी निधी मंजुर करुन घेतला. हा भरघोस निधी मंजुर केल्याबद्धल आ. ज्ञानराज चौगुले यांचा ग्रामस्थांच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात नागूर येथील महादेव दुधभाते, लक्ष्मण माने, गणेश जावळे, जयराम शेवाळे, किशोर जाधव, पवन देडे, गोपाळ वरवटे, अक्षय कांबळे, सौरभ कांबळे, मनोज जाधव, लक्ष्मण जाधव, परमेस्वर माने, शाम जाधव, मनोज जावळे, कल्याण मोरे, अभिषेक जावळे, गोविंद जावळे, दिपक मोरे, महादेव सुरवसे, बाळु मोरे, अक्षय मोरे, सुमित सलगरे, शाम पाटील, प्रशांत जावळे, राकेश जावळे, महेश जाधव, ऋषीकेष सुर्यवंशी, अनिकेत जाधव, कृष्णा जाधव, मनोज मोरे, रणजित जाधव यांच्यासह बहुसंख्य तरुण युवकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार प्रा.रविंद्र गायकवाड, आ. ज्ञानराज चौगुले व युवानेते किरण गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला.
त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे महिलांच्या खात्यावर रक्कम मिळाल्यामुळे महिलांनी आ. ज्ञानराज चौगुले यांना राखी बांधुन महायुतीचे आभार मानले. यावेळी शिवसेना लोहारा तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, उमरगा तालुका प्रमुख बळीराम सुरवसे, सरपंच सौ.अर्चना गणपती कांबळे, उपसरपंच तथा बाजार समिती माजी सभापती दिनकरराव जावळे पाटील, सार्वजनिक बांधकाम उप विभाग अभियंता संतोष घोडके, शाखा अभियंता मुकुंद शिंदे, माजी गटनेते अभिमान खराडे, अरुण जगताप, परवेज तांबोळी, सागर पाटील, प्रताप लोभे, अमोल पाटील, नगरसेवक अमिन सुंबेकर, के.डी.पाटील, दिपक रोडगे, नगरसेवक पती आयुब शेख, विकास जावळे पाटील, ज्ञानोबा जावळे, चेअरमन चंद्रकांत पाटील, प्रवीण चंदनशिवे, विनोद पाटील, ज्ञानेश्वर सोमवंशी, ग्रामपंचायत सदस्य जाफर मुलानी, शालेय शिक्षण समिती अधक्ष गोविंद पाटील, व्यंकट शिंदे, प्रदीप खराडे, रमेश जाधव (टेलर), ॲड.श्याम जावळे पाटील, ॲड.शुभम जावळे, युवा सेना तालुका प्रमुख दत्ता मोरे, शहर प्रमुख श्रीकांत भरारे, सद्दाम मुलानी, गोवर्धन मुसांडे, रमिज महमदरफी तांबोळी, पृथ्वीराज गोरे यांच्यासह महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.