लोहारा तालुका एआयएमआयएमच्या वतीने टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त लोहारा शहरात गुरुवारी (दि.२८) रक्तदान शिबीर घेण्यात आले. या रक्तदान शिबिरात एकूण ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
लोहारा शहरातील आझाद चौकात हे रक्तदान शिबीर घेण्यात आले. पोलीस निरीक्षक अजित चिंतले, उपनगराध्यक्ष आयुब शेख, नगरसेवक अमीन सूंबेकर, शब्बीर गवंडी यांच्या हस्ते रक्तदान केलेल्या युवकांना प्रमाणपत्र देण्यात आले. या शिबिरासाठी एआयएमआयएमचे लोहारा तालुकाध्यक्ष अमिरहामजा खुटेपड, आझाद ग्रुपचे अध्यक्ष अल्ताफ सुंबेकर, मैनुद्दीन बागवान, सकलेन सौदागर, मुकिम बागवान,इम्रान शेख, इब्राहिम पटेल, साजिद खुटेपड, साबीर सय्यद आदी उपस्थित होते. या शिबिरात धाराशिव येथील रेणुका ब्लड बँकेने रक्तसंकलन केले. दिनेश चोले, अशोक गायकवाड, परशराम वाघमारे, चेतन रणखांब, राजश्री गायकवाड आदींसह ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांनी हे रक्तसंकलन केले. या शिबिरात एकूण ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.