कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम अंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरदास यांच्या आदेशानुसार लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात फिरती कर्करोग मोबाईल व्हॅन मार्फत शुक्रवारी (दि.२१) मुख, स्तन व गर्भाशय कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण १७६ जणांची तपासणी करण्यात आली.
या तपासणी शिबिराचे उदघाटन सरपंच आशा सुभाष कदम यांच्या हस्ते व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जगदीश बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी स्त्रीरोग तज्ञ डॉ. आदिती खामितकर, डेंटल सर्जन डॉ.जितेंद्र मेटे, वैद्यकीय अधिकारी डॉ.धीरज सोमवंशी, डॉ.निवेदिता बिराजदार, डॉ.प्रियंका बंदीछोडे यांच्यासह प्रा.आ.केंद्र कानेगाव व माकणी येथील सिएचओ कर्मचारी, आशा कार्यकर्ती आणि शिबिरासाठी आलेले लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. या शिबिरात प्रा.आ.केंद्र कानेगाव व माकणी अंतर्गत आलेल्या एकूण १७६ कर्करोग संशयित लाभार्थीची तपासणी करण्यात आली.