अनेक वर्षांचा संघर्ष व प्रतिक्षेनंतर अयोध्येतील नवनिर्मित भव्य मंदिरात श्री प्रभू रामचंद्राच्या मृर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. ही घटना भारतीयांसाठी मोठ्या आनंदाची असून सर्वांनी २२ जानेवारी हा दिवस मोठ्या सणा सारखा साजरा करावा असे आवाहन तालुक्यातील जेवळी येथील मठाधीश म.नी.प्र श्री गुरु गंगाधर महास्वामीजी यांनी केले आहे.
अयोध्येतील निर्मानाधीन मंदिरात २२ जानेवारीला श्री प्रभू रामचंद्रांची मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा होणार आहे. त्यानिमित्ताने अयोध्या येथून अभिमंत्रित होऊन आलेल्या अक्षता कलशाचे गुरुवारी (दि. ४) तालुक्यातील जेवळी येथील श्री गुरु सिद्धेश्वर विरक्त मठात विधीवत मंत्रपूजन मठाधीश म.नी.प्र. श्री गुरु गंगाधर महास्वामीजी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. यावेळी परिसरातील भोसगा, रुद्रवाडी, फनेपूर, वडगाव, हिप्परगा (सय्यद) आदी गावांसाठी अक्षता कलश सुपूर्त करण्यात आले.
यावेळी ह.भ.प. कमलाकर कोळी, ह.भ.प. हरी गाडेकर (गुरुजी), हणमंत भुसाप्पा, शंकर जाधव, मनोज तिगाडे, शिवराज चिनगुंडे, चंद्रकांत ढोबळे, नंदकुमार वेदपाठक, आणप्पा बिराजदार, दत्तात्रय गाडेकर, परमेश्वर तोरकडे, अरुण हावळे, रमेश मुरमे, सुधीर कोरे, योगीराज सोळसे, अमर पणुरे, सिद्राम भुसाप्पा, बस्वराज स्वामी, अंगद पवार, रितेश मानाळे, रामचंद्र अनदुरे, श्रीशैल बिराजदार, बाळासाहेब कटारे, महेश सारने, सोमनाथ बिराजदार आदींसह परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी किशोर होणाजे, बालाजी चव्हाण, सतिश ढोबळे, शैलेश नकाशे, वैजिनाथ होनाजे, सुरेश डिग्गे, हरीओम कोरे, रोहित कारभारी
शंकर साखरे, रोहित दंडगुले, विशाल सुतार, चेतन शिंदे, आदींनी परिश्रम घेतले.