लोहारा तालुक्यातील आरणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवरात्र निमित्त मंगळवारी (दि.३०) सकाळी दांडियारासचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पांचाळ, शिक्षक बाळासाहेब कदम, मेघराज कदम, सांस्कृतिक विभाग प्रमुख सुप्रिया माळवदकर, प्रिया दरेकर, आरणी गावचे उपसरपंच सिद्धेश्वर लादे, गावातील महिला, शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते. यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी देवीची नऊ रूपे साकारली होती. नवरात्र उत्सव काळात पूजा केली जाते. नवदुर्गाची पूजा ही देवीच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे अशी माहिती सुप्रिया माळवदकर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिली.







