लोहारा तालुक्यातील हिप्परगा (सय्यद) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी निवडण्यात आली. यात अध्यक्षपदी आनंद सुरवसे, उपाध्यक्ष सदाशिव हिरवे, सचिव पदी राजेंद्र मोरे यांची निवड करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी निवडीसाठी शुक्रवारी (दि.४) बैठक घेण्यात आली. यावेळी मागीलवर्षी झालेल्या खर्चाचा लेखाजोखा मांडला. यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले जयंती प्रबोधनात्मक व विविध समाजपयोगी उपक्रमाने साजरी करण्याचे बैठकीत निश्चित केले. यानुसार समाजप्रबोधनात्मक भीमगीत गायनाचा कार्यक्रम दि. २३ एप्रिल रोजी रात्री आयोजित करण्यात आला आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक दि. २४ एप्रिल रोजी काढण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानंतर जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्षपदी आनंद सुरवसे यांची तर उपाध्यक्ष पदी सदाशिव हिरवे, सचिव पदी राजेंद्र मोरे, कोषाध्यक्ष पदी दर्शन मोरे यांची निवड करण्यात आली. मिरवणूक प्रमुख म्हणून सुरेश मोरे, गुलाब मोरे, अरविंद सुरवसे, राम मोरे तर सल्लागार म्हणून दगडू हिरवे, भैरवनाथ कांबळे, मारुती मोरे यांची निवड करण्यात आली. यावेळी डीबीएन ग्रुप लोहारा तालुकाध्यक्ष अमित सुरवसे, माजी अध्यक्ष गणेश कांबळे, ठकाजी कांबळे, युवराज सुरवसे, एकनाथ कांबळे, बाळू हिरवे, तुकाराम मोरे, शुक्रचारी हिरवे, चिंतामणी मोरे, सूर्यकांत कांबळे, विश्वास कांबळे, दयानंद मोरे, यशवंत कांबळे, करण कांबळे, शंकर मोरे, गणेश मोरे, पांडू हिरवे, भीमा हिरवे, महादू कांबळे, सतीश सुरवसे, भानुदास कांबळे, राम सुरवसे, महिपती मोरे, लखन सुरवसे आदी उपस्थित होते.