लोहारा तालुक्यातील जेवळी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय गाडेकर यांची काँग्रेस (काँग्रेस) ओबीसी विभागाच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
लोहारा तालुक्यातील जेवळी येथील दत्तात्रय गाडेकर यांची काँग्रेसच्या ओबीसी विभागाच्या तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल लोहाऱ्यात दत्तात्रय गाडेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शामसुंदर तोरकडे, नगरसेवक दिपक मुळे, माजी तालुकाध्यक्ष बाबासाहेब जाधव, आयनोद्दीन सवार, प्रभाकर बिराजदार, रौफ बागवान, इस्माईल मुल्ला आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.