मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत लोहारा तालुक्यातील एकोंडी (लो) येथे ग्रामपंचायत कार्यालयात रविवारी (दि.७) मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप कार्यक्रम घेण्यात आला. यात गावातील १२७ स्त्री-पुरुष यांच्या डोळ्यांची तपासणी करून चष्मे वाटप करण्यात आले.
जनता फाउंडेशन पुणे, श्री स्वामी समर्थ बहुद्देशीय सेवाभावी संस्था लातूर व ग्रामपंचायत कार्यालय एकोंडी (लो) यांचे संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमासाठी पंचायत राज प्रशिक्षण संस्था मुरुडचे प्राचार्य श्री पांगळ, राहुल खरात, नेत्रतज्ञ संकेत होळकर, शैलेश सूर्यवंशी, राम भिकाने, उपसरपंच विकास पाटील, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन नरेंद्र पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री. जाधव, ग्रामपंचायत अधिकारी महादेव जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्राचार्य श्री पांगळ व राहुल खरात यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत नऊ घटकावर कशाप्रकारे काम करायचे याबाबत प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तरवरील अभियानामध्ये बक्षीसा बाबत मार्गदर्शन केले. तसेच प्राचार्य श्री पांगळ यांनी शौचालय वापर शौचालयाचे प्रकार परिसर स्वच्छता वैयक्तिक स्वच्छता हरित गाव पाणीदार गाव स्वच्छता बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमांमध्ये गावातील १२७ स्त्री-पुरुष यांच्या डोळ्यांची तपासणी करून चष्मे वाटप करण्यात आले. तसेच तसेच १७ नागरिकांना मोतीबिंदूचे ऑपरेशन करणेबाबत शिफारस करण्यात आली.













