लोहारा (Lohara) तालुक्यातील उंडरगाव येथील गजगौरी विजयकुमार सूर्यवंशी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्फत महाराष्ट्र व गोवा राज्य अंतर्गत घेतलेल्या सहाय्यक प्राध्यापक पदाच्या परीक्षेत यश संपादन केले आहे.
१५ जून रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. यात गजगौरी सूर्यवंशी यांनी वाणिज्य विषयात उत्तीर्ण होऊन यश संपादन केलेले आहे. या अगोदर त्यांनी ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयात गेल्या वर्षी यश संपादन केलेले आहे. त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण लोहारा येथील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयातून पूर्ण केले आहे. उच्च शिक्षण हे वाघोली येथील भारतीय जैन संघटनेच्या वरिष्ठ महाविद्यालयातून पूर्ण केले आहे. सध्या त्या महाविद्यालयात ग्रंथपाल या पदावर कार्यरत आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल प्रबंध समिती सदस्य सुरेश साळूंके, महाविद्यालयाचे प्राचार्य संजय गायकवाड, प्राचार्य संतोष भंडारी, प्राचार्य दिलीपकुमार देशमुख, मुख्याध्यापक संजय जाधव, पुणे विद्यापीठाचे डॉ. राजेंद्र कुंभार, प्रा.महादेव नरवडे, डॉ. लिंबाजी प्रताळे, प्रा.कोटरंगे सर, प्रा. विश्वास हसे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले. त्यांचे माहेर हे मोघा (बू) असून त्या नितीन दगडू जाधव यांच्या पत्नी आहेत.









