लोहारा तालुक्यातील मोघा बु. येथील गजगौरी नितीन जाधव या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या सहायक प्राध्यापक पात्रता परीक्षा ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.
या परीक्षेसाठी एकूण एक लाख नऊ हजार २५० विद्यार्थी सहभागी झाले होते. परीक्षेत सात हजार २७३ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ६.६६ टक्के एवढी आहे. गजगौरी नितीन जाधव ह्या सध्या पिंपरी पुणे येथील भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत. उंडरगाव हे त्यांचे मूळ गाव आहे. उंडरगाव येथील श्री. विजय सूर्यवंशी व सौ. सुरेखा सुर्यवंशी हे त्यांचे आई वडील आहेत. लोहारा येथील नेताजी सुभाषचंद्र ज्यू कॉलेजच्या माजी विद्यार्थी आहेत.
सेट परीक्षेसाठी त्यांना महादेव नरवडे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल प्राचार्य डी. बी. देशमुख, संतोष भंडारी व संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंके यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.