लोहारा तालुक्यातील आष्टाकासार येथे कृषी विभागामार्फत नॅनो डीएपी, नॅनो युरिया आणि स्नेल कील गोगलगाय व्यवस्थापन या औषधाबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषी विभागामार्फत औषधे वाटप करण्यात आले.
तालुका कृषी अधिकारी महेश देवकते, मंडळ कृषी अधिकारी नयन मगर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कृषी पर्यवेक्षक रवी बनजगोळे, कृषी सहाय्यक सचिन पवार यांनी नॅनो डीएपी, नॅनो युरिया आणि स्नेल कील गोगलगाय व्यवस्थापन याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच महाडीबीटी अंतर्गत बॅटरीवरील पंप, एमआरईजीएस अंतर्गत फळबाग लागवड, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करण्यास आवाहन केले. यावेळी उपसरपंच वसंतराव सुलतानपुरे, चेअरमन शिवमूर्ती फुंडीपल्ले यांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ (सोडत) काढण्यात आली. यावेळी शेतकरी सिद्रामप्पा तडकले, विजयकुमार टिकांबरे, प्रशांत सोमवंशी, मुकेश मुळे, निखिल मदने, खंडेराव शेरीकर, जयप्रकाश सोलापूरे, बालाजी कोरे, प्रशांत आळंगे, सागर टिकांबरे, अहमद पटेल, शेख सुलतानपाशा, बाळू सगर, राजेंद्र शिंदे, मोहन आकडे, प्रवीण शिंदे, उमेश शेरीकर, पिंटू मदने, अमोल बलसुरे, कृषी मित्र जिनेन्द्र कासार व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.