लोहारा (Lohara) तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका उलन कांबळे ह्या नियत वयोमानानुसार प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.
मुख्याध्यापिका उलन कांबळे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त लोहारा केंद्रातर्फे केंद्रप्रमुख विश्वजित चंदनशिवे व घटक शाळेचे सर्व मुख्याध्यापक यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सत्यजित जाधव हे होते. यावेळी विजय लोमटे, उपाध्यक्ष अश्विनी मोरे, केंद्रप्रमुख विश्वजित चंदनशिवे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्या अंजली गोरे, केंद्रीय मुख्याध्यापक दत्ता फावडे, विकास घोडके, मुख्याध्यापक काका इंगळे, राजू माळवदकर, परमेश्वर सुर्यवंशी, दाजीबा साबळे, राजकुमार वाघडोळे, सहदेव ढोले, सविता जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावळी केंद्राच्या वतीने पुर्ण आहेर, भेटवस्तू, शाल, हार अशा प्रकारे साहित्य देवून सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिप्परगा (रवा) शिक्षक वृंद व शाळा व्यवस्थापन समिती, विजय लोमटे परिवार, उषा मोरे परिवार यांच्या वतीनेही यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विकास घोडके, विजय लोमटे, विश्वजित चंदनशिवे, नारायण घोडके, पद्मीनी देशमुख यांनी मनोगत करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी विद्यार्थींनी तर्फे सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधाकर घोडके, नागेश बंगले, नरेंद्र औटे, हरीदास साळुंके, शिवशंकर वलदोडे, गजानन सुतार, युवा प्रशिक्षणार्थी उषा मोरे यांनी परीश्रम घेतले. सत्काराला उत्तर देताना उलन कांबळे यांनी पुर्ण सेवेतील सहकारी, हिप्परगा ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रायपंचायतीचे पदाधिकारी, महिला मंडळ यांचे आभार मानले. यावेळी विजया जाधव, व्यंकटेश घोडके, आजी माजी विद्यार्थी, पालक, शिक्षकवर्ग, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.