Wednesday, October 21, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयात वृक्ष लागवड

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

एक पेड माँ के नाम या संकल्पनेनुसार लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयात वृक्ष लागवड करण्यात आली. या रोपांना विद्यार्थ्यांनी आपल्या आईचे नाव दिले. रोपांची योग्य ती काळजी, जतन व संगोपन करण्याची यावेळी शपथ देण्यात आली.
तालुक्यातील सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयात हा उपक्रम राबविण्यात आला. संस्थेने एकूण ४०० रोपांची खरेदी सुमारे प्रशालेच्या स्वाधीन केली. प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी एक झाड आपल्या आईला समर्पित करून लावावे व त्याची योग्य ती काळजी घ्यावी आणि शालेय परिसर नयनरम्य व निसर्गमय करावा असा या उपक्रमाचा उद्देश होता. पंचक्रोशीमध्ये निसर्गाच्या सानिध्यात शिक्षण देणारी एकमेव प्रशाला असा नावलौकिक करण्यासाठी आजचा हा उपक्रम राबवण्यात आल्याचे सांगण्यात आले. वेगवेगळ्या प्रकारची रोपे \”श्री स्वयंभू नर्सरी, धाराशिव येथून आणून संस्थेचे उपाध्यक्ष गोविंद पवार, एसबीआय बँकेचे लोहारा शाखेचे मॅनेजर प्रमोद नामा, साधनव्यक्ती श्री मुगळीकर सर यांच्यासह उपस्थित सर्व माता-पालक, गुरुजन वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.२७) रोपांची लागवड करण्यात आली. रोपाला विद्यार्थ्यांनी आपल्या आईचे नाव दिले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना रोपांची योग्य ती काळजी, जतन व संगोपन यासंबंधीची शपथ देण्यात आली. सप्तपर्णी, कदंब, बकुळ, लिंबू, बॉटल पाम, चाफा, अशोक, मलेशियन नारळ, वड, पिंपळ व गुलाब इत्यादी प्रजातीची रोप लागवड मोठ्या उत्साहात करण्यात आली. या कार्यक्रमासाठी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक डॉ. रवींद्र मुगळे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुनील माने, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन प्रशालेचे नंदनवन करण्याचा ध्यास घेतला.

Tags: वृक्ष लागवडशांतेश्वर विद्यालयसास्तुर
Previous Post

प्रसिद्ध कवी, व्याख्याते अनंत राऊत आज लोहारा शहरात; विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शन

Next Post

हिप्परगा (रवा) येथील मुख्याध्यापिका उलन कांबळे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

हिप्परगा (रवा) येथील मुख्याध्यापिका उलन कांबळे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!