लोहारा तालुक्यातील होळी येथील जिल्हा परिषद शाळेत बुधवारी (दि.२६) संविधान दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक देविदास पावशेरे होते. सुरुवातीला सकाळी गावातून संविधान जागृती फेरी काढण्यात आली. त्यानंतर संविधान प्रतिमेचे पूजन शालेय मुख्यमंत्री प्रबुद्ध गायकवाड याच्या हस्ते करण्यात आले. संविधानावर आधारित विविध घोषवाक्य, निबंध, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा स्पर्धा आदी उपक्रम राबवून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी वाय. पी. सांडूर यांनी संविधानावर आधारित माहिती दिली. अशोक सुतार, वनराज सूर्यवंशी, राहुल स्वामी, मोहिनी जाधव, संगमेश्वर मठपती यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शालेय मुख्यमंत्री प्रबुद्ध गायकवाड यांनी केले. माधुरी कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले.














