लोहारा (Lohara) तालुक्यातील कोंडजीगड येथे शुक्रवारी (दि.२८) तालुका विधी सेवा समिती, विधिज्ञ मंडळ लोहारा व हॅलो मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह कायद्याविषयी माहिती देण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आला.
तालुक्यातील कोंडजीगड येथील ग्रामपंचायत कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ऍड. सत्यवान अडसूळे यांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्याविषयी मार्गदर्शन केले. तसेच हॅलो मेडिकल फाउंडेशन अणदूरचे प्रकल्प समन्वयक सतीश कदम यांनी ग्राम बाल संरक्षण समितीची जबाबदारी व भूमिका याबद्दल सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमासाठी गोरखनाथ मुर्टे, शाहूराज नेलवाडे, दादासाहेब मुर्टे, मुख्याध्यापक कोकाटे, ग्रामसेवक मारेकर, दिवाणी न्यायालय लोहारा ज्यू. क्लर्क शिंदे सर, हॅलोच्या समुपदेशक वासंती मुळे यांच्या सह ग्रामस्थ, महिला, युवक उपस्थित होते. सूत्रसंचालन नितीन मोरे यांनी तर दादासाहेब मुर्टे यांनी आभार मानले.