महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार लोहारा येथील पत्रकार निळकंठ कांबळे यांना पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल शुक्रवारी (दि.२४) पंचायत समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी शितल खिंडे, सहाय्यक गटविकास अधिकारी जे. टी. वग्गे, जसवंतसिह बायस, बालाजी बिराजदार, गिरीश भगत, गणेश खबोले आदी उपस्थित होते.