लोहारा तहसील कार्यालयाच्या वतीने गुरुवारी (दि.२५) राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उत्कृष्ट काम केलेल्या बीएलओंचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या उर्मिला पाटील ह्या होत्या. या कार्यक्रमास नायब तहसीलदार सुजाता हांकारे, माधव जाधव, गटशिक्षण विस्तार अधिकारी भास्करराव बेशिकराव, सुभाष चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पूनरिक्षण कार्यक्रम २०२४ अंतर्गत उत्कृष्ठ कार्य केलेल्या २५ बीएलओ यांचा प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला. यामध्ये एम.व्ही. बोकडे, गौरीशंकर कलशेट्टी, पप्पू कांबळे, गणेश वाघमारे, कमलाकर येनेगुरे, कृष्णा माळी, किरण भुजंगे, डी.एम. कुर्ले, ईश्वर पाटील, लोहारा तहसील कार्यालयचे कर्मचारी वजीर अत्तार, सचिन पांचाळ यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भास्करराव बेशिकराव यांनी तर सूत्रसंचालन सोमवंशी सर यांनी केले.