लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त सोमवारी (दि.२०) हळदी – कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे उद्घाटन लोहारा नगर पंचायतच्या अध्यक्षा वैशाली खराडे, स्कूलच्या संचालिका सविता जाधव यांच्या हस्ते भारतमाता, माता सरस्वती, राष्ट्रमाता जिजाऊ, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी लोहारा नगरपंचायतच्या माजी उपनगराध्यक्षा नाजमिन शेख, नगरसेविका शामल माळी, कमल भरारे, सारिका बंगले, आरती कोरे, मयुरी बिराजदार, संगीता पाटील, सुमन रोडगे, आरती गिरी आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना सविता जाधव यांनी सांगितले की, आजचा हा कार्यक्रम म्हणजे “स्त्री शक्तीचा सन्मान”आहे. यावेळी महीलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. आणि स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी स्कूलतर्फे संचालिका सविता जाधव यांनी कार्यक्रमास उपस्थित सर्व महिलांचे स्वागत केले. यावेळी लोहारा तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला. यावेळी उपस्थित सर्व महिलांना तीळ – गूळ, चुडे, वान म्हणून भेटवस्तू देण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्कुलमधील सोनाली काटे, वैशाली गोरे, लक्ष्मी करदोरे, ईश्वरी जमादार, मीरा माने, अनिता मनशेट्टी, हेमा पाटील, सरिता पवार, सुलोचना वकील, रेश्मा शेख, शीतल बिराजदार यांनी अथक परिश्रम घेतले.