२१ मार्च रोजी सकाळी ६.०८ च्या सुमारास ४.५ रिश्टर स्केलचा भूकंप (earthquake) झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापण यंत्रणेवर दिसुन आली. हिंगोली (hingoli) सह नांदेड, परभणी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के बसले आहेत. त्यामुळे मराठवाडा (marathwada) हादरला आहे. नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या उत्तर भागातील रामेश्वर तांड्याच्या उत्तर भागात भूकंपाचे केंद्र असल्याचे दिसून आले. याची खोली १० किलोमीटर असल्याचे दिसत आहे. सकाळी ६ वाजून ८ मिनिटाच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. ४.५ रिस्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली. त्यानंतर लगेचच दुसरा हलका धक्का पहिल्या धक्क्यानंतर अकरा मिनिटांनी म्हणजे सकाळी ६.१९ वाजता ३.६ रिश्टर स्केल चा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापण यंत्रणेवर दिसुन आली. मात्र या भूकंपाचे केंद्र तिन किलोमीटर दक्षिणेला असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या रामेश्वर तांड्याच्या दक्षिण भागात असल्याचे दिसून आले. याही भूकंपाची खोली १० किलोमीटर असल्याचे दिसत आहे. मराठवाड्यातील १९९३ च्या भूकंपानंतरचा हा सर्वात मोठा आहे. यावेळेस हिंगोली नांदेड परभणी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी या भूकंपाचे धक्के बसल्याचे फोन आले.