Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने मोर्चा; तहसीलदारांना दिले मागण्यांचे निवेदन

मुख्य संपादक by मुख्य संपादक
23/07/2024
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने मोर्चा; तहसीलदारांना दिले मागण्यांचे निवेदन
Ad 10

विशालगड (कोल्हापूर) व गजापूर येथील घटनेच्या निषेधार्थ लोहारा तालुका सकल मुस्लिम समाजाच्या वतीने सोमवारी (दि.२२) लोहारा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सोमवारी लोहारा शहरातील व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त केला.
विशालगड येथील गजापुर मशिदीवर समाजकटकांनी बेकायदेशीर जमाव गोळा करुन केलेल्या हल्याच्या निषेध करत यातील आरोपीवर कठोर कार्यवाही करुन अधिकारी यांना तात्काळ निलंबीत करण्यात यावे, अशी मागणी लोहारा येथील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने तहसीलदार काशीनाथ पाटील यांना यावेळी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, दि १४ जुलै रोजी विशालगड कोल्हापुर येथे गडावरील अतिक्रमण उठविण्याच्या कारणावरुन जे नियोजन करण्यात आले होते. त्या आंदोलनात गडाच्या पायथ्याशी छोट्या-छोट्या गावात संघटनेच्या लोकांनी एकत्रीत येऊन गरीब कुटुंबातील मुस्लिम समाजाच्या लोकांवर भ्याड हल्ला करुन मुस्लिम महिला, लहान मुले, वृद्ध लोकांना अमानुषपणे मारहाण करुन त्यांची दुकाने, घरे, चार चाकी, दुचाकी वाहनांची जाळपोळ केली आहे. मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळावर या लोकांनी कट करुन धार्मिक स्थळाची मोठ्या प्रमाणात नासधुस करुन धार्मिक स्थळाचे पावित्र नष्ट केले आहे. या घटनेचा लोकशाही मार्गाने आम्ही निषेध करीत आहोत. या घटनेस जबाबदार असणाऱ्या जातीयवादी संघटना व गुंड कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात केली आहे. सकल मुस्लिम समाज लोहारा तालुका यांच्या वतीने सोमवारी (दि.२२) लोहारा शहर बंदची हाक दिली होती. या बंदला शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून प्रतिसाद दिला.
लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, आझाद चौक मार्गे तहसिल कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यात मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान कसलाही अनुचित प्रकार घडु नये यासाठी पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांनी पोलिस बंदोबस्त ठेवला होता. यावेळी उपनगराध्यक्ष आयुब शेख, नगरसेवक अमिन सुंबेकर, शब्बीर गवंडी, हाजी बाबा शेख, आयुब अब्दुल शेख, नगरसेवक आरिफ खानापुरे, गौस मोमीन, सलीम शेख, महेबुब गवंडी, इकबाल मुल्ला, आय्याज सवार, आब्बास शेख, दादा मुल्ला, नयुम सवार, शेरु मासुलदार, नजीर हड्डे, जहिर खुटेपड, खुनमिर मोमिन, निहाल मुजावर, शाहरुख गवंडी, आरबज फकीर, वसीम हेद्दे, फयाज नदाफ, अल्ताफ शेख, मोईज शेख, नोमान पठाण, आरबाज कमाल, साहिल शेख,सिराज सिद्दीकी, अन्वर कुरेशी, झमिर सावर, समद सुंबेकर, अल्ताफ सुंबेकर, मैनु बागवान, कैफ कुरेशी, यांच्यासह मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: मुस्लिम समाजमोर्चालोहारा
Previous Post

डाक विभागाच्या वतीने कानेगाव येथे डाक चौपाल (चावडी) कार्यक्रम; डाक विभागाच्या विविध सुविधांची दिली माहिती

Next Post

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सास्तुर येथे रुग्णांना फळे तर दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सास्तुर येथे रुग्णांना फळे तर दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सास्तुर येथे रुग्णांना फळे तर दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's