लोहारा (lohara) तालुक्यातील कानेगाव येथे डाक विभागाच्या वतीने शनिवारी (दि.२०) डाक चौपाल (चावडी) कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पोस्टाच्या विविध सुविधांबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन कानेगावच्या उपसरपंच आशा कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डाक निरीक्षक सुनील नाटकर, डाक निरीक्षक अनिल जाधव, धाराशिव पोस्ट बँकेचे शाखा व्यवस्थापक चंद्रकांत झेंडे, लोहारा पोस्ट ऑफीसचे पोस्ट मास्तर उद्धव कलाहरे यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय पोस्ट (india post) ऑफीस हे टपाल सेवा पुरवण्याइतपत मर्यादित न रहता त्याची व्याप्ती खूप मोठी झाली आहे. पोस्टाच्या प्रत्येक ऑफीसमध्ये बँकिंग क्षेत्राशी निगडित असलेल्या अनेक सेवा पुरवल्या जाणाऱ आहेत. ज्यात बचत खाते, करंट खाते, पिक विमा पॉलिसी आदी अनेक सुविधा देण्यात येणार आहेत अशी माहिती या कार्यक्रमात देण्यात आली. तसेच तुमच्या पोस्टातील बचत खात्याला डीबीटी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्यामध्ये वृद्धांची पगार, पीएम किसान योजनेचा लाभ, मुखमंत्री लाडकी बहिण, पिक विमा पॉलिसीचा लाभ, निराधार योजना अशा अनेक गोष्टींचा उपयोग खातेधरकाना होणार आहे अशी माहिती उपस्थितांना देण्यात आली.
यावेळी बोलताना अनिल जाधव यांनी सांगितले की, आपल्या धाराशिव जिल्ह्यात असे जास्तीत जास्त कार्यक्रम घेऊन पोस्टातील योजनेची जनजागृती केली जाणार आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त खाती उघडली जाणार आहेत. भारत सरकारच्या सुकन्या समृध्दी योजना, महिला सन्मान पत्र योजना, आरडी खाते, किसान विकास पत्र, राष्ट्रीय बचत पत्र, योजनेची माहिती प्रत्येक गावात व घरात पोहचली पाहिजे व त्याचा लाभ सर्व समाजाला मिळाला पाहिजे हाच या योजनेचा उद्दिष्ठ आहे. याविषयी कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही तुमच्या पोस्ट मास्तरशी संपर्क साधा असे आवाहन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत झेंडे यांनीही उपस्थितांना माहिती सांगितली.
लोहारा ऑफीसचे पोस्ट मास्तर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, पोस्टात एफडीवर इतर बँकेपेक्षा जास्त व्याजदर दिले जाते. ज्येष्ठ नागरिकांना विशेष योजना आहेत. आता पोस्टात आधार सेवा केंद्र ही सुरू करण्यात येणार आहे. ज्यात नवीन आधार कार्ड काढणे, दुरुस्ती करणे, मोबाईल लिंक, पत्ता व फोटो अपडेट करणे या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पोस्टाचा संपूर्ण व्यवहार हा पेपर लेस झाला आहे. तुम्ही फक्त आधार कार्ड घेऊन आला की बँकेशी निगडित कोणताही व्यवहार करू शकता अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी कानेगावच्या वतीने संतोष चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी बालाजी कदम, महादेव जगताप, त्रिमुख कदम, नानाजी लोभे, सुदाम पाटील, शेषेराव क्षीरसागर, इनामदार रोफ, राजेंद्र हिंडोळे, बाबा भुरे, महादेव कदम, सुग्रीव भोपळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोस्ट मास्टर बालाजी पांचाळ, शिवराज झिंगाडे, अर्जुन पाटील, पूजा वाघदरे, विठ्ठल हक्के, सुधाकर खुर्दे, प्रवीण भद्रसेट्टे यांनी परिश्रम घेतले.
