१९९३ च्या महाप्रलयंकारी भूकंपात (Earthquake) मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी लोहारा तालुक्यातील सास्तुर (sastur) येथे सोमवारी (दि.३०) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गरजू महिलांना साड्यांचे वाटप तसेच किराणा किट वाटप करण्यात आले.
लोहारा तालुक्यातील सास्तुर व परिसरातील गावातील शेकडो नागरिक १९९३ च्या महाप्रलयंकारी भूकंपात मृत्युमुखी पडले होते. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी सास्तुर चौरस्ता येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी ही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सास्तुरच्या सरपंच शितल पाटील या होत्या. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, युवासेनेचे मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.लोहारा, उमरगा तालुक्यातील भूकंपग्रस्त गावांना विशेष मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करत असल्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी ह.भ.प. महेश महाराज माकणीकर, महंमद बागवान, शिवसेना लोहारा तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, उमरगा तालुका प्रमुख बळीराम सुरवसे, शेखर अंबेकर, नहूश पाटील, अल्ताफ बागवान, राहुल सरवदे, सुमित क्षीरसागर, शांतेश्वर दलाल, अन्वर कोतवाल, संतोष यादव, अरुण जगताप, हरी भोसले पेठसांगवीकर, गुलाब मोरे, मारुती जाधव, फझल कादरी, राजेंद्र माळी, बालाजी बनसोडे, गहिनीनाथ सुरवसे, पिंटू मुरटे आदींसह नागरिक उपस्थित होते.
जेवळी येथेही श्रद्धांजली कार्यक्रम
लोहारा (lohara) तालुक्यातील जेवळी(jewli) येथेही भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सरपंच महानंदा पनुरे, उपसरपंच बसवराज कारभारी, लोहारा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शामसुंदर तोरकडे, बुद्धिवंत साखरे, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय गाडेकर, विजया गाडेकर, सुभाष बिराजदार, साहेबलाल शेख, महादेव मोघे, अमर पनुरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.