माकणी धरण परिसरात मोठे पर्यटन क्षेत्र उभारणार असल्याचे प्रतिपादन आमदार ज्ञानराज चौगुले यांनी शनिवारी (दि.२८) केले आहे.
लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्प १०० टक्के भरल्याने ह.भ.प.महेश महाराज माकणीकर, परमपूज्य शामचैतन्य महाराज यांच्या हस्ते व आमदार ज्ञानराज चौगुले, युवासेना मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत जलपूजन करण्यात आले. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले बोलत होते. यावेळी पुढे बोलताना आ. ज्ञानराज चौगुले म्हणाले की, मराठवाड्यातील प्रति पंढरपूर मानले जाणाऱ्या तेरणा काठच्या श्री संत मारुती महाराज मंदीर परिसरात जायकवाडीच्या धर्तीवर मोठे पर्यटन स्थळ उभारण्यासाठी मी पाठपुरावा करत आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना प्रभावीपणे राबविली गेल्याने ०.६० दलघमी मातीचा शेतकऱ्यांनी उपसा केलेला आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात प्रतिवर्षी पेक्षा ०.६० दलघमी एवढी वाढ झाली आहे. याचा सुनियोजित वापर करून परिसरातील शेतकऱ्यांना व या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनांना लाभ देता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपविभागीय अधिकारी गणेश पवार, माजी सरपंच मोहन पनुरे, लोहारा तालुकाप्रमुख जगन पाटील, उमरगा तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता अमर पाटील, उपविभागीय अभियंता नितीन पाटील, शाखा अभियंता के.आर. येनगे, नायब तहसीलदार सुजाता हंकारे, सचिन जाधव, राजेंद्र माळी, विठ्ठल मुसांडे गुरुजी, विनोद मुसांडे, शुभम साठे, किशोर गायकवाड, गोविंद बिराजदार, अरुण जगताप, संदिपान बनकर, मनोज जाधव, धैर्यशील सूर्यवंशी, गहिनीनाथ सूर्यवंशी आदी उपस्थित होते.