लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये भारतीय शास्त्रज्ञ सी.व्ही. रमण यांची जयंती हि “विज्ञान दिन” म्हणून साजरा करण्यात आली. यानिमित्त शाळेत विज्ञान प्रदर्शन घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शहाजी जाधव हे होते. यावेळी स्कुलमधील विज्ञान विषय शिक्षिका सविता जाधव, वैशाली गोरे मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सी.व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर सविता जाधव यांनी विज्ञान दिनाचे महत्त्व सांगून आपले प्रास्ताविकात जय जवान – जय किसान – जय विज्ञान अशी घोषणा दिली. यानंतर वैशाली गोरे यांनी आपले मनोगतात सी. व्ही. रमण यांच्या जीवन व संशोधन कार्य याविषयी माहिती सांगितली. याप्रसंगी प्राचार्य शहाजी जाधव यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये स्कुलमधील विद्यार्थ्यानी चांद्रयान -३, पवनचक्की, नवग्रह , रोबोट, आधुनिक शहर, माती व खडकाचे प्रकार, फुफ्फुसाचे महत्व, पाण्याचे निःसरन व जल शुद्धीकरण यंत्र, मानवी शरीराची रचना, गणिताचे उद्यान, हवेचा दाब, जलचक्र, प्राण्याचे जीवनचक्र असे विज्ञानातील विवीध प्रयोग सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यशवंत चंदनशिवे यांनी तर मीरा माने यांनी आभार मानले. या विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान प्रदर्शनात स्कुलमधील सर्व विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक अनिता मनशेट्टी, ईश्वरी जमादार, सोनाली काटे, हेमा पाटील, सरिता पवार, सुलोचना वकील, रेश्मा शेख यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.