लोहारा (Lohara) तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध कवी, व्याख्याते प्रा. अनंत राऊत (Anant Raut) यांचे मार्गदर्शन होणार आहे.
राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवारी (दि.२७) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात तालुक्यातील दहावी, बारावी तसेच नीट परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध कवी, व्याख्याते प्रा. अनंत राऊत हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार, जि.प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, तहसीलदार रणजितसिंह कोळेकर, गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, युवकचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य किशोर साठे, लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, उमरगा तालुकाध्यक्ष बाबा जाफरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी (दि.२७) सकाळी साडे दहा वाजता हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांनी केले आहे.

