रविवारी (दि.३) पोलिओ (polio) लसीकरण मोहीम असल्याने जिल्हा एकात्मिक आरोग्य केंद्र, कुटूंब कल्याण सोसायटी धाराशिव व लोहारा (Lohara) येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून शनिवारी (दि.२) लोहारा शहरातून पोलिओ विषयी जनजागृती करणारी रॅली काढण्यात आली.
या रॅलीचे उद्घाटन धाराशिव (Dharashiv) येथील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशील चव्हाण यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आले. याप्रसंगी लोहारा ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल मंडले, धाराशिव आशा जिल्हा समन्वयक सतीश गिरी, माजी पंचायत समिती सदस्य दीपक रोडगे, सामजिक कार्यकर्ते विक्रांत संगशेट्टी, मुख्याध्यापक शहाजी जाधव, प्रा. यशवंत चंदनशिवे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी आपल्या ५ वर्षापर्यंतच्या लहान बाळास पोलिओची लस आपल्या नजीकच्या दवाखाना, अंगणवाडी, पोलिओ बूथवर अवश्य द्यावी असे आवाहन करण्यात आले. यावेळी रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी लस द्या बाळा – पोलिओ टाळा, दोन थेंब पोलिओचे – आयुष्य लाभेल मोलाचे, पोलिओच्या लसीत आहे जादू – बाळ होणार नाही अधू असे पोलिओबाबत जनजागृती व संदेश देणारे फलक हातात घेवून आणि घोषणा देत
भारतमाता मंदिरपासून, बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा फुले चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, हिप्परगा रोड, जगदंबा मंदीर, नागराळ रोड तहसील कार्यालय यामार्गे शाळेपर्यंत हि रॅली काढण्यात आली. याप्रसंगी ग्रामीण रूग्णालय लोहारा येथील आरोग्य कर्मचारी अंगद गिराम, दत्ता बोर्डे, शिवा थोरात, तुकाराम परसे तसेच स्कुलमधील शिक्षक कर्मचारी सिद्धेश्र्वर सुरवसे, व्यंकटेश पोतदार, प्रेमदास राठोड, सविता जाधव, सोनाली काटे, पूजा चौरे, अनिता मनशेट्टी, माधवी होगाडे, ईश्वरी जमादार, मीरा माने, यांच्यासह पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.