उस्मानाबाद जिल्हा मजूर सहकारी संघ (फेडरेशन) मर्या. उस्मानाबादच्या संचालक मंडळ निवडणुकीत सर्वसाधारण लोहारा प्रतिनिधी मतदारसंघातून पंडित ढोणे यांनी विजय मिळवला आहे.
उस्मानाबाद जिल्हा मजूर सहकारी संघ (फेडरेशन) मर्या उस्मानाबादच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी (दि.५) मतदान झाले. लोहारा तालुक्यातील १४ पैकी १३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. उस्मानाबाद जिल्हा मजूर सहकारी संघ (फेडरेशन) मर्या उस्मानाबादच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी (दि.५) मतदान प्रक्रिया पार पडली. सर्वसाधारण लोहारा प्रतिनिधी मतदारसंघातून जयश्री गोवर्धन मुसांडे व पंडित ढोणे हे दोन उमेदवार निवडणूक लढवत होते. या मतदारसंघात १४ मतदार आहेत. त्यापैकी १३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. शनिवारी सकाळी ८ ते दुपारी ४ मतदान पार पडले. या निवडणुकीची मतमोजणी रविवारी (दि.६) झाली. यात पंडित ढोणे यांनी ७ तर जयश्री गोवर्धन मुसांडे यांना ६ मते मिळाली. या मतदारसंघातून पंडित ढोणे विजयी झाले आहेत.