लोहारा पोलीस स्टेशन अंतर्गत दुरक्षेत्र सास्तुर परिसरात विविध जातींच्या १५० झाडांचे मान्यवरांच्या हस्ते शनिवारी (दि.६) वृक्षारोपण करण्यात आले.
तालुक्यातील सास्तुर गावात व परिसरात लोहारा पोलीस व विविध गावच्या पोलीस पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने विविध जातीच्या वृक्ष लागवड उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यावेळी उमरगा उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक अजित चिंतले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे, पोलीस हवालदार विठ्ठल ढवण, महिला पोलीस हवालदार सरोजा काजळे, पोलीस नाईक रामप्रसाद सांगवे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील मोरे, लक्ष्मण भोपळे, श्री. साखरे, माधव कोळी, सर्व पोलीस स्टाफ तसेच पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांच्या हस्ते विविध जातीचे एकत्रित १५० झाडांचे यामध्ये आंबा, आवळा, सैतुक, बांबू अश्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.