लोहारा तालुक्यातील होळी येथील तेजस्विनी सरवदे यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद शाळा व मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
तालुक्यातील होळी येथील तेजस्विनी सरवदे यांचे दि. ८ डिसेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ होळी येथील जिल्हा परिषद शाळेचा परिसर, शाळेच्या समोर आणि हनुमान मंदिर परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. दौंड पंचायत समितीचे ग्रामविकास अधिकारी बालाजी सरवदे यांनी आवाहन केले आहे की, गावामधे कोणीतेही व्यक्ती मरण पावले नंतर आपण त्यांच्या नावाने ५ फळ झाडे लावावी. त्या व्यक्तीच्या नावाने पाच झाडे लावले, आणि त्यांचे संगोपण केले तर त्या व्यक्तीची एक आठवण राहते व गावाचे सौंदर्य वाढते व गावातील प्रदुषण कमी होण्यास मदत होते असा संदेश त्यांनी दिला आहे. म्हणूनच त्यांनी हा आगळा वेगळा उपक्रम त्यांच्या पत्नी कै. तेजस्विनी सरवदे यांच्या स्मरणार्थ राबविला आहे.
गावातील कांही तरूण युवकांनी व समाज बांधवांनी यासाठी सहकार्य केले. गावात यापुढे मृत व्यक्तीच्या नावे वृक्ष लागवड करण्यासाठी प्रचार प्रसिद्धी करण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सरपंच सरोजा बिराजदार, मुख्याध्यापक वनराज सुर्यवंशी, सतीश माळी, गणेश वाघमारे, आशोक जाधव, ॲड. सुखदेव होळीकर, कृष्णा सरवदे, दिलीप सरवदे, भरत सरवदे, राहुल स्वामी, संगमेश्वर मठपती, मोहिनी जाधव, साक्षी गायकवाड, प्रमोद माने यांच्यासह शाळेचे विद्यार्थी आणि गावातील नागरीक उपस्थित होते.