Vartadoot
Friday, August 7, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

माकणी येथील सिद्धेश्वर यात्रेत कुस्त्यांची दंगल – माकणीच्या राम कुसळकरने जिंकली अंतिम कुस्ती

मुख्य संपादक by मुख्य संपादक
17/12/2024
in लोहारा तालुका
A A
0
माकणी येथील सिद्धेश्वर यात्रेत कुस्त्यांची दंगल – माकणीच्या राम कुसळकरने जिंकली अंतिम कुस्ती
Ad 10

लोहारा तालुक्यातील माकणी येथील ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेनिमित्त रविवारी (दि.१५) कुस्त्यांची दंगल झाली. यात राम कुसळकर (माकणी) व संदीप नरवडे (रामलिंग मुदगड) यांच्यात अंतिम कुस्ती झाली. ही कुस्ती राम कुसळकर (माकणी) यांनी जिंकली. कुस्त्या पाहण्यासाठी माकणीसह पंचक्रोशितील हजारो कुस्ती  प्रेमींनी मोठी गर्दी केली होती.
लोहारा, उमरगा, औसा तालुक्यातील भक्तांचे श्रध्दास्थान असलेले माकणी येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा शनिवारी (दि.१४) सुरु झाली. दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त ही यात्रा भरवली जाते. यात्रेनिमित्त ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहा दरम्यान दररोज विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या कुस्त्या रविवारी (दि.१५) पार पडल्या. सिद्धेश्वर मंदिरासमोरील मैदानात ही कुस्ती स्पर्धा पार पडली. यातील अनेक मल्लांच्या कुस्त्या लक्षवेधी ठरल्या. राम कुसळकर (माकणी) व संदीप नरवडे (रामलिंग मुदगड) यांच्यात अंतिम कुस्ती झाली. ही कुस्ती यात्रा कमिटीचे अध्यक्ष मधुकर साठे, माजी सरपंच विठ्ठल साठे, पंडित ढोणे, शुभम चौगुले, भागवत आलमले, दादासाहेब मुळे, ओंकार साठे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत लावण्यात आली. ही कुस्ती झटपट निकाली निघाली. अंतिम कुस्ती विजेत्या राम कुसळकर (माकणी) याला ११ हजार रुपये व चांदीची गदा देण्यात आली. यावेळी माकणीसह पंचक्रोशीतील मल्लांच्या कुस्त्या लक्षवेधी ठरल्या. कुस्त्या पाहण्यासाठी माकणीसह परिसरातील कुस्तीप्रेमींना मोठी गर्दी केली होती. या कुस्त्यासाठी पंच म्हणून शहाजी आळंगे, अंकुश कोरडे, फुलचंद आळंगे, राम लोभे यांनी काम पाहिले.
ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी यावेळी भविकांनी मोठी गर्दी केली होती. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात रहाट पाळणे, खेळणी, मिठाई, स्टेशनरीचे दुकाने, यासह केळी व पेरू च्या व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने थाटली होती. यात्रेसाठी बाल – गोपाळासह महिला, ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: यात्रासिद्धेश्वर यात्रा महोत्सव माकणी
Previous Post

माकणी येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा महोत्सवास सुरुवात

Next Post

होळी येथील जिल्हा परिषद शाळा व मंदिर परिसरात वृक्षारोपण

Related Posts

हिरा सोलापूरे यांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार जाहीर
लोहारा तालुका

हिरा सोलापूरे यांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार जाहीर

05/08/2026
अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी दि. १२ ऑगस्ट रोजी लोहारा येथे रास्ता रोको आंदोलन करणार
लोहारा तालुका

अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी दि. १२ ऑगस्ट रोजी लोहारा येथे रास्ता रोको आंदोलन करणार

05/08/2026
विद्यार्थ्यामध्ये सृजनशीलता आणि व्यक्तीमत्व विकास होणे गरजेचे – प्रा. डॉ. समाधान पसरकल्ले; बी.एस.एस. महाविद्यालयात वाङ्‌मय मंडळाचे उद्घाटन
लोहारा तालुका

विद्यार्थ्यामध्ये सृजनशीलता आणि व्यक्तीमत्व विकास होणे गरजेचे – प्रा. डॉ. समाधान पसरकल्ले; बी.एस.एस. महाविद्यालयात वाङ्‌मय मंडळाचे उद्घाटन

03/08/2026
आ. बसवराज पाटील यांचा लोहाऱ्यात सत्कार
लोहारा तालुका

आ. बसवराज पाटील यांचा लोहाऱ्यात सत्कार

02/08/2026
ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
Next Post
होळी येथील जिल्हा परिषद शाळा व मंदिर परिसरात वृक्षारोपण

होळी येथील जिल्हा परिषद शाळा व मंदिर परिसरात वृक्षारोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's