लोहारा तालुक्यातील मार्डी येथील प्रयागबाई भीमराव कदम (१०२ वर्षे) यांचे बुधवारी (दि.१०) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी (दि.११) सकाळी दहाच्या सुमारास मार्डी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी कै. भीमराव अण्णा कदम यांच्या पत्नी तसेच सामाजिक कार्यकर्ते शिवाजी अप्पा कदम व राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे तालुकाध्यक्ष नरदेव कदम यांच्या त्या आई होत्या.













