लोहारा तालुका विधीज्ञ मंडळाची वार्षिक पदाधिकारी निवडीची बैठक नुकतीच संपन्न झाली. २०२४ च्या वार्षीक कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांची निवड यावेळी करण्यात आली. यात लोहारा (Lohara) तालुका विधीज्ञ मंडळाच्या अध्यक्षपदी अँड. देविदास जाधव तर उपाध्यक्ष पदी अँड. संध्याराणी भुसने (तिगाडे) यांची निवड करण्यात आली आहे.
विधिज्ञ मंडळाच्या वार्षिक पदाधिकारी निवडीसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सदरच्या निवडी ह्या अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध करण्यात आल्या. यावेळी विधीज्ञ मंडळ अध्यक्षपदी अँड. देविदास जाधव, उपाध्यक्षपदी अँड. संध्याराणी भुसने (तिगाडे), सचिवपदी अँड. दादासाहेब जानकर, सहसचिव अँड. माधव गव्हाळे, कोषाध्यक्षपदी अतुल कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीस विधीज्ञ मंडळाचे सदस्य अँड. एम.यु.जट्टे, अँड.एम एस. वचने-पाटील, अँड. दादासाहेब पाटील, अँड पंडीत मुसांडे, अँड.सागर पणुरे, अँड.सत्यवान अडसुळे, अँड.रामदास जाधव, अँड.विजया गुंड, अँड. एस.पी.शेख, अँड.बी.के.भुजबळ, अँड.के.डी.मोरे, अँड एम.व्ही.साठे, अँड.टी.एस.मोरे, अँड. डी.एम.जाधव, अँड. एस.बी.कदम (मार्डीकर), अँड.आर.आर.भोंडवे, अँड.एस.एन.बादुले आदी उपस्थित होते.