लोहारा तालुक्यातील कास्ती येथे ग्रामदैवत कलेश्वर देवस्थान व इस्माईलसाब यांच्या यात्रेनिमित्त शनिवारी (दि.२१) प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी कुस्त्यांची जंगी फड झाला. यात धाराशिव येथील राहुल मुळे याने अंतिम कुस्ती जिंकून कास्ती केसरी किताब पटकावला.
तालुक्यातील कास्ती येथे इस्माईलसाब यांच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांचा फड होतो. यावर्षीही या कुस्त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला. या मैदानात लहान मुलांच्या कुस्त्याही लक्षवेधी ठरल्या. अंतिम कुस्तीसाठी पारितोषिक रु. १५ हजार व गदा परवेज तांबोळी यांच्याकडून ठेवण्यात आले होते. अटीतटीच्या झालेल्या अंतिम कुस्तीत धाराशिव येथील राहुल मुळे याने सोलापूर येथील आकाश बनसोडे याचा पराभव करत कास्ती केसरी किताब पटकावला. यावेळी सुधीर पाटील, शिवसेना मोहन पणुरे, संजय मुरकुटे पुणे, संजय पारवे, भागवत बनकर, अमरजितसिंग मान, दयानंद साळुंके, विशाल साळवी, वैभव पवार, सागर पाटील इत्यादींनी उपस्थिती लावली. या कुस्त्यांसाठी परवेझ तांबोळी, विजयकुमार रवळे, किसन चव्हाण, संदीप रवळे, भुजंग परसे, हंसराज अंबेकर, आकाश पाटील, भागवत चव्हाण, विनोद पाटील, राजेंद्र जावळे, अशोक वाघ, विजयकुमार रावळे, गौतम वाळके, जोतिबा साबळे, आनंद पाटील, गोविंद वाघमारे, नामदेव चव्हाण, रामेश्वर कार्ले, सुंदर जवळगे, गणेश जाधव आदींनी पुढाकार घेतला. कुस्त्यांचे समालोचन राष्ट्रीय पंच गोविंद घारगे व दाजीबा साबळे यांनी केले. कास्ती केसरी किताबाचा मानकरी ठरलेल्या राहुल मुळे याचा गावकऱ्यांच्या वतीने परवेज तांबोळी यांनी सन्मान केला.