लोहारा तालुक्यातील बेलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवारी (दि.१५) शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
शासनाने पहिले पाऊल हा उपक्रम राबविण्यात यावा असे निर्देश दिले होते. त्यानुसार शाळेच्या पहिल्या दिवशी पहिले पाऊल हा उपक्रम राबविण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांचे पायाचे ठसे घेण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आली. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारामध्ये खिचडी व शिरा देण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष यांच्या उपक्रमामधून शाळेला पुस्तके देण्यात आली. विस्ताराधिकारी बालाजी यरमुनवाड यांच्या हस्ते ही पुस्तके शाळेला देण्यात आली. प्रवेश उत्सवामध्ये विद्यार्थ्याची गावामधून मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लहू जाधव यांच्या हस्ते पुस्तक वाटप करण्यात आले. सुधीर राठोड, विजय गुळवे, आप्पासाहेब कदम आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक परमेश्वर सूर्यवंशी, आनंत कानेगावकर, खिजर मोरवे, सुनंदा निर्मळे, मल्लिकार्जुन कलशेट्टी, उपस्थित होते.