श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी (दि.८) श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्षा वैशाली खराडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पवार यांच्या हस्ते संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी माजी गटनेते अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष अमिन सुंबेकर, शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, जयंती उत्सव समिती अध्यक्ष संभाजी जवादे, प्रमोद बंगले, श्रीकांत भरारे, प्रशांत काळे, विष्णू नारायणकर, नाना पाटील, विजयकुमार ढगे, दिपक मुळे, हरी लोखंडे, के. डी. पाटील, जगदीश लांडगे, सलीम शेख, शब्बीर गवंडी, इकबाल मुल्ला, भीमाशंकर डोकडे, मल्लिकार्जुन कलशेट्टी, रौफ बागवान, प्रभाकर बिराजदार, ईश्वर बिराजदार, मिलिंद नागवंशी, भगवान चौगुले, सुनिल देशमाने, बसवंत बंगले, गणेश खबोले, पंडीत निर्मळे, नागेश बंगले, सुनील ठेले, विठ्ठल बंगले, रमेश ठेले, ज्ञानेश्वर निर्मळे, गुरुनाथ बंगले, नागनाथ बंगले, बसवंत जवादे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.














