लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील श्री शांतेश्वर प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक सुनील माने यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला. यावेळी उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरली पवार हे होते. या कार्यक्रमासाठी गोविंदराव पवार, शंकरप्पा मिटकरी, राजारामबापू पवार, आकांक्षा चौगुले, अजित भस्मे, रमाकांत जोशी, हरी लवटे, ह.भ.प. वलांडीकर महाराज, अँड. सयाजी शिंदे, मुख्याध्यापक बालाजी नादरगे, मुख्याध्यापक डॉ. रवींद्र मुगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी माने दांपत्यावर गुलाब पुष्पवृष्टी करून केली. संस्था पदाधिकारी, नातेवाईक व मित्रमंडळीतर्फे माने दांपत्याचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी रमाकांत जोशी, ह.भ.प. हरी लवटे, रवींद्र मुगळे यांनी सुनील माने सरांच्या ३९ वर्ष सेवेचा सविस्तर आढावा घेतला. संगीतप्रेमीसाठी सकाळी स्वरांजली संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बंटी कुलकर्णी, सुजित माने, बी.जी. पाटील, श्री पांचाळ यांनी बहारदार गीते सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मदन पाटील यांनी तर श्री शेळगे सर यांनी आभार मानले.

