लोहारा तालुक्यातील लोहारा खुर्द येथे शिवविचार युवा रणरागिणी निर्माण फाऊंडेशनच्या वतीने शनिवारी (दि.१९) जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
तालुक्यातील लोहारा खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गावातील आत्महत्याग्रस्त शेतकरी किसन भगवान रसाळ यांना या कार्यक्रमात दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. शिवविचार युवा रणरागिणी निर्माण फाऊंडेशनचे विभाग प्रमुख काकासाहेब मूर्टे, संभाजी पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सकाळी दहा वाजता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेचे मुख्याध्यापक श्री. साबळे सर यांनी सूत्रसंचालन केले. माजी सरपंच शेखर पाटील यांनी संस्थेचे या उपक्रम राबविण्याचा उद्देश काय आहे हे सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. साबळे सर यांनी आपले मोलाचे विचार व्यक्त केले. यावेळी सरपंच सचिन व्यंकट रसाळ, उपसरपंच सचिन रसाळ, ग्रामविकास अधिकारी घनश्याम कोकाटे, पोलीस पाटील बिरुदेव सूर्यवंशी, संभाजी पाटील, हणमंत सूर्यवंशी, शिवविचार युवा फाऊंडेशनचे सदस्य प्रवीण रसाळ, पंढरी रसाळ, मंगेश रसाळ, दत्ता गाडवे व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
