Vartadoot
Wednesday, July 23, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सरकारला दिले निवेदन; जनतेला दिलेली आश्वासने फक्त कागदी ‘जुमलेबाजी’ ठरत असल्याचा आरोप

मुख्य संपादक by मुख्य संपादक
06/06/2025
in लोहारा तालुका
A A
0
शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सरकारला दिले निवेदन; जनतेला दिलेली आश्वासने फक्त कागदी ‘जुमलेबाजी’ ठरत असल्याचा आरोप
Ad 10

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने गुरुवारी (दि.५) मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. राज्यातील शेतकरी, महिला, तरुण, वृद्ध आणि सर्वसामान्य जनतेला दिलेली आश्वासने फक्त कागदी ‘जुमलेबाजी’ ठरत असल्याचा आरोप करत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
तहसीलदार रणजित कोळेकर यांना हे निवेदन देण्यात आले. या निवेदनात शेतकऱ्यांच्या आर्थिक कर्जमाफीचा प्रश्न, प्रोत्साहन अनुदान न मिळणे, ‘एक रुपयात पीक विमा’ योजनेतील फसवणूक, शेतमालासाठी परदेशातून होणारी आयात, शेतकरी सन्मान योजनेतील अडथळे, हमीभाव व शीतगृह योजनेतील अपयश तसेच मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाचा ढिसाळ व्यवहार याचा उल्लेख करण्यात आला आहे. महिला सुरक्षा आणि लाभ योजनांमध्ये होत असलेली उपेक्षा, वृद्धांच्या पेन्शनमध्ये वाढ न होणे, तरुणांना नोकऱ्या न मिळणे, बेरोजगारीचे वाढते प्रमाण आणि विविध योजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत दिसणारी दिरंगाई यामुळे समाजाच्या सर्व स्तरांमध्ये निराशा पसरली आहे. या सर्व गंभीर समस्यांकडे राज्य शासन आणि प्रशासनाने तात्काळ लक्ष देणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. शिवसेना (उबाठा) लोहारा तालुक्याच्या वतीने सरकारला स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, या समस्या लवकर न सुटल्यास रास्ता रोको आंदोलन, ठिय्या आंदोलन तसेच तहसील कार्यालयावर बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात येईल. शेतकरी, महिला, तरुण, वृद्ध आणि सर्वसामान्य जनता या आंदोलनामध्ये एकजुटीने सहभागी होणार आहेत. हा लढा फक्त एक आंदोलन नव्हे तर राज्यातील शेतकरी समाजाचा आवाज होणार आहे, जो कुणालाही दुर्लक्ष करता येणार नाही असे या निवेदनात म्हटले आहे.


निवेदन देताना शिवसेना जिल्हा संघटक दिपक जवळगे, तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शेतकरी सेना तालुकाप्रमुख शेखर पाटील, माजी सभापती विलास भंडारे, शहरप्रमुख सलीम शेख, माजी नगरसेवक शामसुंदर नारायणकर, युवासेना शहरप्रमुख प्रेम लांडगे, महेबूब गवंडी, राजू स्वामी, रघुवीर घोडके, बळीराम गोरे, अनिकेत स्वामी, सोमनाथ भोंडवे, विजयानंद ओवाडे, राजकुमार सूर्यवंशी, ज्ञानेश्वर लोभे, दत्ता गिरी, चेतन गोरे, प्रशांत गिराम, किशोर सूर्यवंशी, धनराज जाधव, रविकांत भोंडवे, काकासाहेब सूर्यवंशी, तुकाराम वाकळे, हरिभाऊ गोरे यांच्यासह शिवसैनिक, युवासेना पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: निवेदनलोहाराशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
Previous Post

बकरी ईद हा सण शांततेत साजरा करावा – उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांचे आवाहन

Next Post

रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा

Related Posts

लोहारा शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी
लोहारा तालुका

लोहारा शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी

21/07/2025
लोहारा खुर्द येथील शाळेत शालेय साहित्य वाटप
लोहारा तालुका

लोहारा खुर्द येथील शाळेत शालेय साहित्य वाटप

21/07/2025
भाजपाच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी राजेंद्र पाटील यांची निवड
राजकीय

भाजपाच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी राजेंद्र पाटील यांची निवड

15/07/2025
आष्टा हायस्कुलचे दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
लोहारा तालुका

आष्टा हायस्कुलचे दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

13/07/2025
लोहारा तालुक्यातील एकूण ४४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत
निवडणूक

लोहारा तालुक्यातील एकूण ४४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत

11/07/2025
लोहारा येथील वसंतदादा पाटील हायस्कूल मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

लोहारा येथील वसंतदादा पाटील हायस्कूल मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

10/07/2025
Next Post
रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा

रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

513089

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!