लोहारा शहरातील पत्रकार नीलकंठ कांबळे यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, पिंपरी चिंचवड शहर आणि पत्रकार हल्ला विरोधी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आणि पत्रकार दिनानिमित्त दिला जाणारा राज्यस्तरीय आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
सोमवारी (दि.६) ग.दि.माडगूळकर नाट्यगृह, निगडी -पिंपरी चिंचवड येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते दिला जाणार आहे. मा. उदयजी सामंत (उद्योगमंत्री, महाराष्ट्र राज्य), मा. मकरंदजी पाटील (मदत व पुनर्वसन मंत्री,महाराष्ट्र राज्य) आणि मा. आकाशजी फुंडकर (कामगार मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते आणि प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.