लोहारा तालुक्यातील होळी येथील जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले जयंती निमित्त बालिका दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सरोजा बिराजदार होत्या. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले. सावित्रीबाई व ज्योतीबांच्या वेशात आलेल्या श्रावणी वचने व समबुद्ध गायकवाड व ईतर मुलींनी भाषणे व “मी सावित्री बोलतेय” या नाटिकेचे सादरीकरण केले. यावेळी सर्व बाल सावित्रीचे स्वागत करून खावू वाटप करण्यात आला. सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले. तसेच मुख्याध्यापक डी.बी. पावशेरे यांचे शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष विनोद गायकवाड, ओम बिराजदार, संतोष चव्हाण, ग्रा.पं.सदस्य केशव सरवदे, व्ही.आर. सूर्यवंशी यांच्यासह मोहिनी जाधव, साक्षी गायकवाड आदीसह पालक, विद्यार्थी उपस्थित होते. एस.एस. माळी यांनी सुत्रसंचलन तर एस.जी. मठपती यांनी आभार मानले.