आषाढी एकादशीनिमित्त लोहारा तालुक्यातील तावशीगड येथील शाळेतील विद्यार्थ्यांची बाल दिंडी व पायी वारी
तावशीगड ते माकणी पर्यंत काढण्यात आली. या दिंडीमध्ये इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी म्युझिक सिस्टीम व मृदंगाच्या ठेक्यावर विविध प्रकारांमध्ये पावले खेळली, फुगडी खेळली. विद्यार्थी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, पांडुरंग आणि रुक्मिणी यांच्या वेशभूषामध्ये आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील ग्रामस्थ, पालक, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष, सर्व सदस्य, मृदंग वादक हभप दत्ता इंगळे महाराज व हभप महेश कोळी महाराज औसेकर, श्रीमती मंदाकिनी राजपूत, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तावशी गड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.