प्रतिनिधी / लोहारा
लोहारा तालुक्यातील अचलेर येथील विद्या विकास हायस्कूलमध्ये तालुकास्तरीय विज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी प्राथमिक विभागातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
तालुक्यातील अचलेर येथील विद्या विकास हायस्कूलमध्ये गुरुवारी (दि.२१) तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. लोहाऱ्याचे गटशिक्षणाधिकारी सय्यद असरार यांच्या हस्ते या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष चव्हाण, केंद्रप्रमुख नंदकुमार पोटरे, गजानन मुक्तेदार यांची प्रमुख उपस्थिती होते. या स्पर्धेत तालुक्यातील ४८ शाळांमधील विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रयोग सादर केले होते. यात विद्यामाता इंग्लिश स्कूलने स्मार्ट सिटी ऑन मून या प्रयोगाचे सादरीकरण केले. या प्रयोगासाठी विज्ञान शिक्षक हेड्डे व विद्यार्थी समर्थ पाटील, जानवी झंवर, नरसिंग ओवांडे सहभागी झाले होते. या प्रयोगातून चंद्रावरती स्मार्ट सिटी कशी बनवता येईल याचा आराखडा दाखवण्यात आला. हा प्रयोग यशस्वी करण्याकरिता सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका हिरा सोलापूरे व ओम सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.