लोहारा तालुका शिक्षक व सेवकांची सहकारी पतसंस्थेची विसावी वार्षिक सर्वसाधारण सभा लोहारा येथील पतसंस्थेच्या कार्यालयात चेअरमन राम मुसांडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी सभेचे उदघाटन आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन नगराध्यक्षा वैशालीताई खराडे, नगरसेविका आरती कोरे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुभाष चव्हाण, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी भास्कर बेशकराव, मनोहर वाघमोडे, शिवसेना तालुकाप्रमुख जगन पाटील, माजी गटनेते अभिमान खराडे, शिवसेना नेते राजेंद्र माळी, नगरसेवक आरिफ खानापुरे, के. डी. पाटील, ओम कोरे, प्रमोद बंगले आदींची उपस्थिती होती. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले आपल्या उदघाटनपर भाषणात म्हणाले की, लोहारा तालुका शिक्षक व सेवकांची सहकारी पतसंस्था हि गगनभरारी घेणारी पतसंस्था असून सर्व संचालक मंडळ विना मानधन अहोरात्र काम करतात हि कौतुकास्पद बाब आहे. कर्ज ९ टक्के दराने व लाभांश २ लक्ष भागावर ९.५ टक्के दराने देणारी ही एकमेव पतसंस्था असल्याचा गौरव करुन पतसंस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रास्ताविकात संचालक विकास घोडके यांनी पतसंस्थेचा लेखाजोखा मांडला. यामध्ये संस्थेचे भाग भांडवल ८ कोटी रुपये आहे. कर्ज सुरक्षा विमा योजना लागू केली आहे. लाभांश ९.५ टक्के दराने यावर्षी देय असल्याचे सांगितले. यावेळी आमदार श्री. चौगुले व मान्यवरांच्या हस्ते तालुक्यातील सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करण्यात आला. तसेच गुणवंत शिक्षकांचा गौरव सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. यामध्ये सुप्रिया माळवदकर, (केंद्र कास्ती), रफिक शेख (केंद्र लोहारा), कल्पना चौरे (केंद्र माकणी), भालेराव तात्याराव (केंद्र सालेगाव) शशिकांत डांगे (केंद्र वडगाव) संतोषकुमार भोसले (केंद्र आष्टा कासार) आदर्श सेवक गुरुसिद्धय्या स्वामी (कन्या प्रा.शा. अचलेर) तालुक्यातील आदर्श शाळा पुरस्कार जि. प. प्रा. शाळा जेवळी (दक्षिण) यांना देण्यात आला. तसेच इयत्ता ५ वी ते ८ वी शिष्यवृत्तीधारक, इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी व उच्च शिक्षणात प्रविष्ट झालेल्या सभासद पाल्यांचाही सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय समारोप पतसंस्थेचे चेअरमन राम मुसांडे यांनी करून सर्वांचे आभार मानले.
यावेळी द्वितीय सत्रात व्हाईस चेअरमन सूर्यकांत पांढरे यांनी अहवाल वाचन व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर सचिव व्ही. एस. चंदनशिवे यांनी कोणत्याही सभासदांनी प्रश्नावली दिली नाही. म्हणजे संस्थेवर सर्व सभासदांचा पूर्ण विश्वास आहे असे सांगत पतसंस्थेच्या आर्थिक कामकाजाबाबत सर्व सभासदांना समाधानकारक माहिती दिली. यावेळी संचालक चंद्रकात कदम, जीवन गायकवाड, चंद्रकांत माळी, दत्तात्रय पांचाळ, सतिश जगताप, दत्तात्रय फावडे, मल्लीकार्जून कलशेट्टी, देविदास साळुंके, वंदना अकोसकर, लिपीक रविंद्र कोकणे, सेवक किरण दासिमे, सर्व संघटनांचे तालुका अध्यक्ष, पदाधिकारी व तालुक्यातील बहुसंख्येने सभासद उपस्थित होते.







