वार्तादूत : डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुका क्रीडा संकुल लोहारा शहर परिसरातच व्हावे या मागणीसाठी स्वराज्य पक्षाच्या वतीने लोहारा तहसिल कार्यालयासमोर बुधवारी (दि.२०) सकाळपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. गुरुवारी (दि.२१) या उपोषणास स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश गवळी यांनी भेट दिली. तसेच महाविद्यालययीन विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिला.
लोहारा तालुका क्रीडा संकुल लोहारा शहरातच नगरपंचायतच्या हद्दीमध्ये आरक्षित असलेल्या जागेत किंवा नव्याने जागा आरक्षित करून किंवा शहराच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागात गायरान जमिनीमध्ये करण्यात यावे या मागणीसाठी स्वराज्य पक्षाच्या वतीने बुधवार पासून उपोषण सुरू करण्यात आले आहे. हे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. गुरुवारी (दि.२१) स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश गवळी यांनी उपोषणकर्ते महेश गोरे, तालुकाध्यक्ष प्रशांत थोरात, उपाध्यक्ष तानाजी पाटील यांची भेट घेतली. या उपोषणास शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.