Vartadoot
Tuesday, June 17, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

माकणी येथील यात्रेस आजपासून सुरुवात – रविवारी रंगणार कुस्तीचा जंगी फड

मुख्य संपादक by मुख्य संपादक
14/12/2024
in लोहारा तालुका
A A
0
माकणी येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात
Ad 10

लोहारा तालुक्यातील माकणी येथील ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेस आजपासून शनिवारी ( दि. १४) सुरुवात होत आहे. दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त ही यात्रा भरवली जाते. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे.
लोहारा, उमरगा, औसा तालुक्यातील भक्तांचे श्रध्दास्थान असलेले लोहारा तालुक्यातील माकणी येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा शनिवारी ( दि. १४) सुरु होत आहे. दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त ही यात्रा भरवली जाते. यात्रेनिमित्त माकणी येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहा दरम्यान दररोज विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. शनिवारी ( दि. १४) येथील विठ्ठल रुक्मीणी मंदिरापासून श्री सिध्देश्वर मंदिरापर्यंत गावातील मुख्य रस्त्याने ढोल ताशा, हलगी, टाळ मृदंगाच्या गजरात श्री च्या काठीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक सायंकाळी ५ च्या दरम्यान सिद्धेश्वर मंदिर परिसरात आल्यानंतर काल्याच्या वाटपाने मिरवणूकीचे विसर्जन करण्यात येईल. या यात्रा महोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेला कुस्तीचा जंगी फड रविवारी ( दि. १५) होणार आहे. यासाठी यात्रा कमिटी, ग्रामपंचायत कार्यालय व गावातील कुस्तीगीराकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. शेवटची कुस्ती विजेत्या मल्लास २१ हजार व चांदीची गदा देण्यात येणार आहे.
या यात्रेदरम्यान लहान मुलांच्या मनोरंजनासाठी रहाट पाळणे यासारखे अनेक मनोरंजनाची साधने आली आहेत. याबरोबरच केळी, गृहपयोगी वस्तू, खेळणी, हॉटेल, गिरके आदी व्यापारीही त्यांची दुकाने घेवून मोठ्या संख्येने आली आहेत. ही यात्रा पुर्वीपासून केळीच्या व्यापारासाठी प्रसिध्द आहे. या यात्रेदरम्यान केळीच्या व्यापारातून दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होते. यामुळे परिसरातील केळीचे व्यापारी मोठ्या संखेने येतात. यात्रेदरम्यान कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार होऊ नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवन्यात येणार आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: माकणीसिद्धेश्वर यात्रा महोत्सव माकणी
Previous Post

संविधानाच्या प्रतिकृतीची मोड तोड करून नासधूस करणाऱ्या समाजकंठकाला कठोर शिक्षा करण्यात यावी; निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांच्याकडे केली मागणी

Next Post

लोहारा तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम

Related Posts

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार
आपला जिल्हा

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार

14/06/2025
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
लोहारा तालुका

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम
Blog

विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम

09/06/2025
जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण
लोहारा तालुका

जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण

07/06/2025
शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सरकारला दिले निवेदन; जनतेला दिलेली आश्वासने फक्त कागदी ‘जुमलेबाजी’ ठरत असल्याचा आरोप
लोहारा तालुका

शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सरकारला दिले निवेदन; जनतेला दिलेली आश्वासने फक्त कागदी ‘जुमलेबाजी’ ठरत असल्याचा आरोप

06/06/2025
Next Post
लोहारा तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम

लोहारा तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

505456

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!