Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्टाशिवाय पर्याय नाही – डॉ. विठ्ठलराव लहाने

मुख्य संपादक by मुख्य संपादक
09/01/2024
in लोहारा तालुका
A A
0
जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्टाशिवाय पर्याय नाही – डॉ. विठ्ठलराव लहाने
Ad 10

जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन डॉ. विठ्ठलराव लहाने (Dr. Lahane) यांनी केले. तालुक्यातील आष्टा कासार येथे शनिवारी (दि.६) रात्री व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला.
तालुक्यातील आष्टाकासार येथे सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्था आष्टा कासारच्या वतीने शनिवारी (दि.६) रात्री डॉ. विठ्ठलराव लहाने यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. संधीची गोष्ट या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी डॉ. लहाने बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा उपसरपंच वसंतराव सुलतानपुरे हे होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विष्णू सगर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना डॉ. विठ्ठलराव लहाने म्हणाले की, माणसाच्या जीवनामध्ये संधी सर्वांनाच मिळते. ही संधी आपला दरवाजा सतत ठोठावत असते. जो कोणी संधीचा फायदा घेईल तो सोनच करतो. डॉ. लहाने यांनी आपल्या जीवनातील संधीचे दोन-तीन उदाहरणे दिली. त्यांच्या व्याख्यानाचे एक वैशिष्ट्य म्हणजे आई वडील विद्यार्थी हे जीवनामध्ये कलाटणी मिळण्यासाठी काय करावे, या सारखे उदाहरणे देऊन सांगितले. आईवर कसे प्रेम करावे. आई वडील काय असतात, त्यांच्या सानिध्यात राहील्यास दिवस भरातील थकवा केव्हा जातो तेच समजत नाही. आई सोबत कसे राहावे आणि स्वतः कसे राहतो याचे सुंदर उदाहरणे त्यांनी यावेळी सांगीतले. त्यांच्या व्याख्यानातुन समाजाला एक सुंदर असे उदाहरण दिले. त्यांचे विचार ऐकल्यानंतर कोणताही मुलगा, मुलगी आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमामध्ये सोडण्याचा विचार सुद्धा करणार नाहीत. आई वडिलांबद्दल सांगताना अक्षरशः त्यांची डोळे पाणवले होते. विद्यार्थ्यांना अभ्यास कसे करावे, का करावे, केव्हा करावे याबद्दल स्वतःचे अनुभव सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना महत्व पटवून दिले.


प्रत्येक ठिकाणी डॉ. लहाने यांच्या व्याखानाचीच चर्चा चालु आहे असे गावातील काही व्यक्तींनी सांगितले. आयुष्यामध्ये अशा वक्त्यांचे विचार ऐकल्यानंतर गावचा कायापालट, परिवर्तन झाल्याशिवाय राहणारच नाही असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. या व्याख्यानासाठी आष्टाकासार येथील महीला विद्यार्थी, नागरिक यांच्यासह परिसरातील भोसगा, तुगाव, अचलेर, हंगरगा, अणदुर, जेवळी, आलुर, मुरुम येथील शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक संस्थेचे सचिव सिद्रामप्पा तडकले यांनी केले. सुत्रसंचलन धनराज कुडुकले यांनी तर मनोहर वाघमोडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी सुभाष बलसुरे, ब्रह्मानंद कडते, अण्णाराव पाटील, देविदास बनसोडे, प्रभाकर बचाटे, शरणाप्पा शिदोरे, चंद्रकांत आळंगे, मुरलीधर गोसावी, शरणाप्पा फुंड्डीपल्ले, अंकुश सोमवंशी, विलास पोतदार, चांदशहा अष्टेकर आदींनी परिश्रम घेतले.


———–
रॉकेलच्या दिव्यावर केला अभ्यास

डॉ. लहाने यांनी बोलताना सांगितले की, आमच्या घरची परिस्थिती गरिबीची होती. त्यामुळे लोकांच्या रॉकेलच्या दिव्यावर रात्र रात्र अभ्यास करून मी डॉक्टर झालो आहे. रॉकेलसाठी आमच्याकडे पैसे नव्हते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: डॉ. विठ्ठलराव लहाने
Previous Post

लोहारा तहसिल कार्यालयातील रिक्त पदे तात्काळ भरा – संभाजी ब्रिगेडची निवेदनाद्वारे मागणी

Next Post

निकालानंतर लोहारा शहरात पदाधिकाऱ्यांनी केला जल्लोष

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
निकालानंतर लोहारा शहरात पदाधिकाऱ्यांनी केला जल्लोष

निकालानंतर लोहारा शहरात पदाधिकाऱ्यांनी केला जल्लोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's