लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती उर्मिला पाटील मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (दि.२) वृक्षारोपण करण्यात आले.
सर्वप्रथम वाढदिवसानिमित्त प्राचार्या उर्मिला पाटील मॅडम यांचा सत्कार पोर्णिमा घोडके मॅडम यांच्या हस्ते शाल, फेटा व बुके देउन करण्यात आला. त्यानंतर प्राचार्य पाटील मॅडम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

