Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरा

मुख्य संपादक by मुख्य संपादक
24/02/2025
in लोहारा तालुका
A A
0
धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरा
Ad 10

लोहारा तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी (दि.२२) वार्षिक स्नेहसंमेलन आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात स्कुलच्या विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर बहारदार नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
या स्नेह संमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी विकास संस्थेचे अध्यक्ष अशोकराव जवळगे हे होते. यावेळी संस्थेचे सचिव किशोर साळुंके, माकणीच्या सरपंच स्वाती साठे, सतीश साळुंके, पंडित ढोणे, नागनाथ पवार, स्कुलच्या मुख्याध्यापिका हिरा सोलापूरे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित सर्व मान्यवरांचा शाळेच्या वतीने यथोचीत सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापिका हिरा सोलापूरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी आमदार प्रवीण स्वामी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक आणि समाज हे घटक जर एकत्रित आले तर शाळेचा विकास झाल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणी ते सगळे घटक त्यांच्यासोबत संस्थाचालक सगळे एक दिलाने काम करत असल्यामुळे आपल्याला या शाळेची उन्नती झाल्याची दिसून येते. विद्यार्थ्यांनो, विविध स्पर्धेत यश मिळवून आपल्या शाळेचे तालुक्याचे नाव उज्वल करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या स्नेहसंमेलनात शाळेतील जवळपास ५५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चा जोगवा या गाण्याने झाली. स्नेहसंमेलनामध्ये मिलिटरी सॉंग, माधुरी मिक्स, एसआरके, शिव तांडव, कोळी गीत, पंजाबी गीत, दादा कोंडके, शेतकरी गीत, कॉमेडी सॉंग व लावणीने सर्व उपस्थितांची मने जिंकली. यावेळी सर्वांचे आकर्षण ठरले छत्रपती संभाजी महाराज यांची नाटिका. शेखर स्वामी, उमेश खमीतकर, गजानन माळी यांच्या कल्पनेतून नाटिका साकारली गेली. महाराष्ट्रीयन थीम मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील सण, उत्सव यांचा देखावा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मुलांचे कौतुक करण्यासाठी पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. पालकांमध्ये एक प्रकारचे आनंदाचे वातावरण दिसून आले. मुख्याध्यापिका हिरा सोलापूरे यांच्या नियोजनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओम सूर्यवंशी, महादेवी गिराम, संस्कार म्हमाणे, आरोही तडलगे, संस्कृती गायकवाड यांनी केले. या वार्षिक स्नेहसंमेलनाची सांगता जय जवान जय किसान या गाण्याने करण्यात आली. सुनील कांबळे यांनी आभार मानले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: धानुरीवार्षिक स्नेहसंमेलनविद्यामाता इंग्लिश स्कुल
Previous Post

लोहारा नगरपंचायतीच्या सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता व दिवाबत्ती समितीच्या सभापती पदी कमल भरारे यांची निवड

Next Post

सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी स्वीकारला लोहारा पोलीस ठाण्याचा पदभार

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी स्वीकारला लोहारा पोलीस ठाण्याचा पदभार

सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी स्वीकारला लोहारा पोलीस ठाण्याचा पदभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's