शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कला व सांस्कृतिक गुणांना वाव द्यावा असे आवाहन सुभाष चव्हाण यांनी केले आहे. लोहारा येथील जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळेत शनिवारी (दि.१३) लोहारा केंद्रा अंतर्गत सर्व घटक शाळेच्या मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी लोहारा केंद्रातर्फे धाराशिव जिल्हास्तरीय अधिकारी, कर्मचारी क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धेत केंद्र अंतर्गत विशेष सहभाग नोंदविलेल्या तसेच क्रिडास्पर्धेत विजयी झालेल्या तालुक्यातील सर्व विजेत्यांचे अभिनंदन करुन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विस्तार अधिकारी सुभाष चव्हाण होते. यावेळी केंद्रप्रमुख मोहन शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेत केंद्रातील सहशिक्षिका वर्षा चौधरी यांनी महिला ४५ वर्षापुढील बॅडमिंटन एकेरीमध्ये प्रथम, दुहेरी बॅडमिंटनमध्ये सुषमा जट्टे यांच्यासोबत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच असिफा सय्यद यांच्या जोडीने रिंग टेनिसमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे. भालाफेक पुरूष मध्ये मुकुंद शेटे यांनी जिल्हास्तर तृतीय, एकांकिका तृतीय मधुबाला औटे, कॅरम एकेरी द्वितीय गजानन सुतार, उत्कृष्ट खो-खो व समुह नृत्यासाठी अर्चना साखरे, महानंदा चव्हाण, उत्कृष्ट वक्तृत्वासाठी ज्योती पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नियोजनासाठी व खेळाडूंना प्रोत्साहित केल्याबद्दल सुभाष चव्हाण, सुरेश साळुंके, विकास घोडके यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना विस्तार अधिकारी सुभाष चव्हाण यांनी तालुक्याला मिळालेल्या बक्षिसांचा लेखाजोखा मांडला. यामध्ये महिला बॅडमिंटन एकेरी जिल्हास्तरीय प्रथम गटविकास अधिकारी शितल खिंडे, टेबल टेनिस एकेरी प्रथम राम पांचाळ, टेबल टेनिस दुहेरी प्रथम राम पांचाळ व श्रीकृष्ण भारती, बुद्धीबळ महिला द्वितीय लोकरे,१०० मी धावणे महिला तृतीय अस्मिता सुरवसे, ८००मीटर चालणे मोहन अगंबरे तृतीय, बॅडमिंटन दुहेरी द्वितीय गजानन मक्तेदार व गणेश गोरे यांचेही लोहारा तालुक्याला बक्षिस मिळवुन दिल्याबद्दल व सर्वच सांघिक खेळात व सांस्कृतिक कार्यक्रमात चांगली कामगीरी केल्याबद्दल लोहारा केंद्रातर्फे सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.
यावेळी केंद्रप्रमुख मोहन शेवाळे यांनी पुढील वर्षी अधिक बक्षीसे शिक्षकांनी जिंकण्यासाठी आतापासूनच सराव करावा असे सांगितले. यावेळी घटक शाळेचे मुख्याध्यापक उलन कांबळे, काकासाहेब इंगळे, राजेंद्र माळवदकर, धनंजय जाधव, परमेश्वर सुर्यवंशी, विकास घोडके, लिंबराज बनकर, सहदेव ढोले, राजकुमार वाघडोळे, सुरेखा महाजन, गोविंद जाधव, शिवशंकर वेलदोडे, दाजिबा साबळे, तरन्नुम काझी, शेवाळे मॅडम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विकास घोडके यांनी तर मोहन शेवाळे यांनी आभार मानले.