वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्स संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी मांडवा गावचे महेबुब काझी व सचिव पदी लोहारा तालुक्याचे तौफीक कमाल यांची निवड करण्यात आली आहे.
अधिवक्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि तळागाळात कार्यरत असलेल्या समाजसेवी कार्यकर्त्यांचा एक असा समूह आहे जो भारतात नागरी व मानवाधिकार संरक्षणासाठी संघर्षरत आहे. ए. पी. सी. आर. ना लाभ ना हानी तत्वानुसार चालणारी एक अशी असरकारी संस्था आहे जिला २००६ मध्ये समाजातील शोषित वंचित वर्गांच्या मानवाधिकाराच्या संरक्षणार्थ स्थापित करण्यात आले आहे.ए.पी.सी. आर. च्या कार्यक्रमांमध्ये फौजदारी कायदे आणि मानवाधिकारासंबंधी विषयांवर कार्यशाळेचे आयोजन, मानवाधिकार उल्लंघनासंबंधी घटनांची चौकशी व तपास, सार्वजनिक हितांशी संबंधित प्रकरणांची देखभाल जेणेकरून फौजदारी न्यायप्रणालीमध्ये व्यापक परिवर्तन आणता यावे, कैद्यांच्या अधिकारांसंबंधी विषयांवर जागृती, विधीनिर्माण प्रक्रियेवर लक्ष ठेवणे जेणेकरून सकारात्मक हस्तक्षेप करता यावा. सामान्य जनतेला जागरूक करणे आणि विविध समाजविधायक विषयांवर अभियान राबविणे आदी कामाचा यात समावेश आहे.